नागमोडी वळणाची वाट
सप्तशृंगीचा अवघड घाट ... धृ
आई वनाईचा डोंगर
दिसे दुरून ग सुंदर
कडेकपारी डोंगर दरी
आई बसली शिखरावरी
भोळ्या भक्ताचे रक्षण करी
अवतीभवती झाडी घनदाट
सप्तशृंगीचा अवघड घाट ... १
माता भवानी दुर्गा झाली
अशा रूपात दुर्गा आली
चामुंडा रूपे प्रगटली
चंडिका माय माऊली
मानवा तारण्या आली
रूप पाहून काळीज फाट
सप्तशृंगीचा अवघड घाट ... २
तिची महती मी सांगू किती
गुण आईचे गाऊ किती
तिथं पायरी पायरीवर
भक्त जाळिती कापूर
सुख मिळतया भरपूर
काय वर्णू आईचा थाट
सप्तशृंगीचा अवघड घाट ... ३
या डोंगर कपारीत
कुणी बकरं ग मारित
घनदाट अशा झाडीत
कुणी कोंबडं ग सोडीत
कुणी नवस ग फेडीत
आई भक्ताला देतेय भेट
सप्तशृंगीचा अवघड घाट ... ४
-भिवा रामचंद्र परब
No comments:
Post a Comment