किती ग सुखाचं, किती आनंदाचं,मायेचं धराण ...
मायेचं धराण..... अंबा माझा जीव की पराण ..
माझ्या शिरावर धरली ही छाया
सख्ख्या आईपरी लावली माया
मनानं भजते,आईला पुजते,दोन्ही करांनं ...
वणीला जायची मी धरली गाडी
आईला घेतली हिरवी साडी
संगतीला घेतलं...आईच्या ओटीचं भराण...
माया ती लाविते जीव पल्याड
म्हणून लागले अंबाच याड
निवेद आवडीचा तिला ग पोळीचं पुराण...
सवाशीण मी.. एकुलती एक
अंबाबाईची मी लाडाची लेक
आदिमायेने उद्धारिले ग ..माझं हे घराण...
- भिवा रामचंद्र परब
Very very nice Poem
ReplyDelete