पाश्चात्य लेखक डॉ. रॉब युंग हे मानसशास्त्रीय लिखाणाबद्दल
प्रसिध्द असून त्यांनी लिहिलेल्या सुमारे पंचवीस
पुस्तकांपैकी अनेक पुस्तके बेस्ट सेलर ठरलेली आहेत. त्यांच्या 'आय इज फॉर इन्फ्युअन्स' या पुस्तकाचा मराठी अनुवाद 'सूत्रे प्रभाव पाडण्याची' या नावाने सुदर्शन आठवले यांनी केलेला आहे.
एखाद्याला प्रभावित करून आपले काम कसे करून घ्यावे याचे मानसशास्त्राच्या आधारे
केलेलं विश्लेषण असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.
प्रभाव पाडणे हे एक कौशल्य आहे.काही लोक नैसर्गिकरित्या
प्रभावशाली असतात, तर
काही लोक मानसशात्रीय पातळीवरील तंत्रकौशल्य विकसित करून सर्वसामान्यांवर प्रभाव
पाडतात मतपरिवर्तन करणे म्हणजे बळजबरी करणे नव्हे, तर समोरच्याला त्याच्याही नकळत आपल्या बाजूला
वळवून घेणे. त्यासाठी समोरची व्यक्ती नकार देऊ शकणार नाही,अशी विनंती अथवा मागणी कशी करायची? नीतिमत्तेच्या चौकटीत काटेकोरपणे राहून ही
प्रभावशाली कसे बनता येईल याचे मौलिक मार्गदर्शन प्रस्तुत पुस्तकात आहे.
बहुसंख्यांचे शहाणपण, देहबोलीचे छुपे संकेत, शब्द आणि प्रतिमा यांचे असाधारण सामर्थ्य, छोट्या कृती आणि मोठी परिणती,कल्पनाशक्तीला आवाहन मैत्री आणि मेहेरबानी, बक्षिसे देण्याचे दुष्परिणाम, मन वळविण्याचा परिस्थितीजन्य उपायांचे सामर्थ्य
आणि त्वरेने मन वळविण्याची वेगवान तंत्रे अशा नऊ प्रकरणातून प्रभाव पाडण्याच्या
कौश्यल्यासंबंधी मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून विस्तारपूर्वक ऊहापोह केलेला आहे.
पुस्तकातील प्रत्येक प्रकरणात आवश्यक त्या ठिकाणी माहिती देऊन प्रकरणात आलेले
मुद्दे आणखी सोपे करून सांगितलेले आहेत.
मनपरिवर्तन आणि व्यक्तिमत्त्व विकास यासाठी पुस्तकात
दिलेल्या टिपा उपयुक्त आहेतच, पण घर, कार्यालय आणि परस्परांमधील संबंध या प्रत्येक
ठिकाणी उपयोगी पडतील अशा आहेत. मानसशास्त्राच्या अभ्यासकांनी मुद्दाम अभ्यासावे असे हे पुस्तक आहे.
पुस्तकाचे नाव : सूत्रे प्रभाव पाडण्याची
मूळ लेखक :
डॉ. रॉब युंग
अनुवाद : सुदर्शन आठवले
प्रकाशक : मेहता पब्लिकेशन हाऊस, पुणे
पृष्ठे : ३२२ किमंत रु ३५०/-
-भिवा रामचंद्र परब
(पूर्वप्रसिद्धी दै. सामना रविवार 'उत्सव पुरवणी' -२७ डिसेंबर,२०१५ )
No comments:
Post a Comment