चैताचं चांदणं कसं टिपूर पडलं
टिपूर पडलं ..दर्शन अंबाचं घडलं..
पुनवेचं सुटलं वारं
भरला अंबाचा दरबार
आई करते या उद्धार
भक्त करिती जयजयकार
पुरणाच्या पोळीचं… जेवण वाढलं...
दर्शन अंबाचं घडलं..
सात शिखरांचा डोंगर
कसा दिसतोय सुंदर
त्या डोंगर माथ्यावर
आहे अंबाचं मंदीर
मंदिरी जाण्याला... माझं मन हे वढलं ...
दर्शन अंबाचं घडलं...
आई जगदंबा लई गुणी
अशी जगात नाही कुणी
तिनं महिषासुरा मारुनी
ठरली महिषासुरमर्दिनी
बकरं मारिलं….. कुणी कोंबडं सोडलं...
दर्शन अंबाचं घडलं...
चामुंडा माय माऊली
चंडिका तीच महाकाली
माता भवानी रूपात आली
आई दुर्गामाता झाली
सुगंधा लेकीचं..... नातं आईशी जडलं...
दर्शन अंबाचं घडलं...
No comments:
Post a Comment