दीन जनांचा पालनकर्ता
उभा आहे
पाषाणी
ऐका
जैतीर देवाची कहाणी ..धृ
तुळशीचा जैता होता शेतकरी
साऱ्या गावाची करी वतनदारी
कुणी
म्हणती तो करी चाकरी
सैन्यात
होता राजाच्या पदरी
वतनदारी
मिळाली निष्ठा पाहूनी
ऐका
जैतीर देवाची कहाणी ..१
गोरगरिबांची
तयाला जाण
म्हणून
सारा गांव देई मान
नोकर
चाकर राबती घरीदारी
नागन
त्याचा खास सेवेकरी
गावाचा
पोशिंदा जैता मोठा दानी
ऐका
जैतीर देवाची कहाणी ..२
नारूराला
नांदत होती तयाची लेक
लाडा-कौतुकाची
एकुलती एक
लग्न
होवूनी फार वर्षे झाली
माय-पिता
लेकरां नाही भेटली
नाही
आली माहेरा लेक शहाणी
ऐका
जैतीर देवाची कहाणी ..३
माता
पिता दोघे कासावीस झाले
भेटावे
लेकीला ध्यानी आले
नागनाला
घेऊनीया सोबतीला
जैता
निघाला लेकीच्या गांवाला
उरि
दाटली ती ममता दिवाणी
ऐका
जैतीर देवाची कहाणी
..४
कमरपट्टा
आणि सोबत तलवार
जैता
परभू भासे मोठा सरदार
चालला
नागन पुढे धन्यासाठी
घेवून
घोंगडी, हातात
काठी
काठी खुळखुळे आवाजी नाणी
ऐका
जैतीर देवाची कहाणी
..५
जंगल
तुडवित दोघे चालले
पायी
चालता वाटेत अंधारले
पुढे
दिसेना रात काळोखाची
वाटे
भिती वाट चुकण्याची
काही
सूचेना गेले डगमगूनी
ऐका
जैतीर देवाची कहाणी
..६
एक किरण
दिसला आशेचा
दूर
होता दिवा उजेडाचा
दिव्याच्या
दिशेने दोघे निघाले
विचारूनी
एका घरी थांबले
जेवणासाठी
शिधा दिला दोघांनी
ऐका
जैतीर देवाची कहाणी
..७
बाहेर
ओसरीवर नागन बसला
जैता
त्याच्यासंगे गप्पात रंगला
तांदूळ शिजता आतून कोणी वदले,
‘वाटतात तांदूळ बाबांच्या मळ्यातले’
जैता
उठला बोल ते ऐकूनी
ऐका
जैतीर देवाची कहाणी
..८
घर
कोणाचे त्यांना ठाऊक नव्हते
ईशकृपेने
ते लेकीचे घर होते
पिता
लेकराची तेथे भेट झाली
पहाता
पित्याला आसवांत न्हाली
पाझर
फुटला मायेला आसवांनी
ऐका
जैतीर देवाची कहाणी
..९
लेक
बोलू लागली पित्याशी,
'मोठ्या घरची लेक झाले दासी
दासी
देईन दिले तुम्ही वचन
घरच्यांनी
केले मला असे शासन
गोड
नाही लागत बाबा अन्नपाणी
ऐका
जैतीर देवाची कहाणी
..१०
ऐकूनी
ते बोल पिता तडफडला
पडूनी गळ्यात लेकीच्या
रडला
भोजन
सोडून निघाले अर्ध्यारात्री
पुढे
काय होईल याची नव्हती भिती
दोघे
चालले दाट रानातूनी
ऐका
जैतीर देवाची कहाणी
..११
रानात
भिल्ल करित होते वाटमारी
आपसांत
त्याची झाली मारामारी
जैतासाठी
काळ तेथे टपून बसला
नियतीचा
फेरा का कुणा चुकला?
वाटेत
दोघांना घेरले भिल्लांनी
ऐका
जैतीर देवाची कहाणी ..१२
कमरपट्टा
खेचूनी जैता धावला
धन्यासाठी
नागन पुढे आला
दोघां
भिल्लांना जैताने मारले
नागनाने
एकाला उडविले
लढाई
चालली अशी जीवघेणी
ऐका
जैतीर देवाची कहाणी
..१३
अचानक
कुठूनी बाण आला
तीर
भिल्लाचा वर्मी लागला
जैताचे
शरीर खाली पडले
वेदनेने ते तेथे कळवळले
नागनाच्या
डोळा आले पाणी
ऐका
जैतीर देवाची कहाणी
..१४
प्रसंग
पाहूनी नागन बावरला
धन्यासाठी
क्षणात सावरला
वेदना
पचवित जैता बोलला
ने मला
परत माझ्या गावाला
प्राण
सोडीन गावाला पाहूनी
ऐका
जैतीर देवाची कहाणी
..१५
झऱ्याच्या पाण्याने
जखम धुतली
झाडपाल्याने
ती लिपली
पाठीवर
घेऊन धन्याचे शरीर
आणिले
त्याने ते वेशीवर
खबर
झाली गावांत कानोकानी
ऐका
जैतीर देवाची कहाणी
..१६
वेशीवरून
सर्वानी त्याला आणिले
डोळे भरून गावाला त्याने
पाहिले
पोशिंदा काळाने हिरावूनी
नेला
गावांत साऱ्या हाहा:कार
झाला
रडू
लागला जो तो वेड्यावानी
ऐका
जैतीर देवाची कहाणी
..१७
लेकीसाठी
बलिदान त्याने केले
गावच्या
मध्यभागी देऊळ बांधले
गावकरी
त्याच्या भक्तीत रमले
सर्वामुखी
त्याचे नांव अमर झाले
या
जैतीराला यावे एकदा पाहूनी
ऐका जैतीर
देवाची कहाणी
..१८
वैशाख
अमावास्येला जत्रा भरते
भक्ताच्या
उत्साहाला उधाण येते
माहेरवासिनी साऱ्या येथे
जमती
जैतीरबाबाचे
आशीर्वाद घेती
भोळ्या भक्ताने लिहिली ही गाणी
ऐका
जैतीर देवाची कहाणी ..१९
-भिवा रामचंद्र परब
(ध्वनीमुद्रिका: ऐका जैतीर
देवाची कहाणी,
संगीत:
हेमंत साने, कंपनी: ए.बी.एस.म्युझिक)
No comments:
Post a Comment