Thursday, 12 January 2017

मंदशी झुळूक सखे

मंदशी झुळूक सखे संग का हासली?
दास तव प्रेमाचा तू स्वप्नपरी भासली
नीलांबरात  एक चांदणी उगाच खुलली
किनार चांदण्याची आज मला लाभली

गंधीत प्रीति हळुवार फुलोनी आली
राग मैफिलीत ती तर छेडून गेली
गात कुहू कोकिळा बाहुपाशी मिळाली
मंदशी झुळूक सखे संग का हासली?

सावरी परस्परां हात हाती मिळावा
गोप जीवनाचा असा विणून जावा
विनम्र स्वरांची कविता जुळून आली
मंदशी झुळूक सखे संग का हासली?

गझल गुणगुणावी तुझ्या रुपात
जागेपणी दिसे मूर्ती तुझी हृदयात
कळत नकळत मने बहरली, गुंतली 
 मंदशी झुळूक सखे संग का हासली?

मंदशी झुळूक सखे संग का हासली?
दास तव प्रेमाचा तू स्वप्नपरी भासली

                               -भिवा रामचंद्र परब

No comments:

Post a Comment