Friday, 6 January 2017

प्रेमाचे चांदणे

प्रेमाचे चांदणे कधी विरू नये
शोकगीत कधी कुणी गावू नये

शब्दाने कळ्या खुलती
आनंदे वाऱ्यावरती डोलती
डोळ्याच्या तुझ्या खुणांनी
जीव होई वेडापिसा
डोळ्यात आंसवे कधी दाटू नये

स्वरात मिलता स्वर
गुलाब फुलती मनी
जगाच्या या भवसागरी
मौज लुटुया जीवनी
सुकाणू शिवाय नांव कधी जावू नये

चांदण्याच्या लाटावरी
गुंफिले धागे आयुष्याचे
आशेच्या किरणांने
रचिले मनोरे भवितव्याचे
भावनेशिवाय प्रीत कधी जुळू नये

प्रेमाचे चांदणे कधी विरू नये
शोकगीत कधी कुणी गावू नये

                       -भिवा रामचंद्र परब

No comments:

Post a Comment