Friday, 6 January 2017

स्मितरेषा फुलली

आकाशीचा चंद्रमा आज ढगाआड दडला
की देण्या दर्शन भूवरी अवतरला
स्मितरेषा फुलली पुनवेच्या चांदण्यागत
वाटते लपून बसावे गालाच्या खळीत

स्निग्ध तेजाचा वर्षाव होतसे पहाताना
उमलत्या यौवनाच्या झोतात हासताना
सळसळत्या वाऱ्याच्या गंधात भिजताना
वाटते लपून बसावे गालाच्या खळीत

गोऱ्या गालावरती आली एक नाजूक बट
सहज चाळा करिता तिजशी दुमडीले ओठ
केसात शोभे फुल गुलाबाचे चांदणे हास्यात
वाटते लपून बसावे गालाच्या खळीत

मदनमस्त हे रूप तुझे..सतेज सुंदर कांती
पायांत वीज... पैंजण रुणझुणती
बावरी नजर करी.. गोड उर्मी हृदयात
वाटते लपून बसावे गालाच्या खळीत

                             -भिवा रामचंद्र परब   

No comments:

Post a Comment