नैराश्येच्या
अंध:कारातून
येते उद्याची
पहाट
क्षणभंगुर
जीवनात
कधी संकटाचे
ताट
निराशा होते
कुणाची
कुणाच्या
नकारात
कुणाच्या
होकारातून
चांदणे फुलते
मनात
शोकगीत
मावळताना
जमू लागते
प्रेमगीत
हे दैव
एकेकाचे
ठरते
कल्पनांतीत
-भिवा
रामचंद्र परब
(प्रकाशित-उन्मेष
-१९८०)
No comments:
Post a Comment