पौर्णिमेच्या चांदण्यात
प्रीत पक्षी गावू
लागले
ताल तुझे, गीत माझे
हळूच स्वर जुळू लागले
निशिगंधी यौवन माझे
बाहुपाशी भुलू लागले
स्मित तुझे रे झेलताना
ओठ थरथरू लागले
भाववेडे रे स्वप्न माझे
आकाशात झुलू लागले
संपता संपेना ती रात
चांदणे शुभ्र खुलू लागले
वृक्षलता धुंद
बेहोषीने
वाऱ्यावरी डोलू लागले
नजरेचे इशारे जीवघेणे
घायाळ करू लागले
स्वप्ने उद्याची चितारीत
सप्तरंग पसरू लागले
कळत नकळत कळीचे
फुल ते उमलू लागले
-भिवा रामचंद्र परब
No comments:
Post a Comment