“एक चूक आयुष्य बदलून टाकते अश्वत्थामासारखे...चुका होऊ नये म्हणून मृगजळामागे लपलेले वाळूचे बंदिस्त डोंगर कदाचित नजरेआड करता येतील पण त्या मृगजळात अडकलेल्या जीवांचे काय? पारध्याच्या जाळ्यात अनवधानाने जरी सापडला तरी त्याची शिकार ही होणारच! मृगजळ हे निसर्ग नावाच्या पारध्याने लावलेले जणू जाळेच!”
उमाळा हा माझ्या गळ्यात जन्मजात आहे. पण अंतरातल्या उमाळ्याला मी सहजासहजी उजागर होऊ देत नाही. कारण उमाळा उजागर होऊ न देणे ही समस्त पुरुषांची लक्षणे आहेत,अर्थांत काही अपवाद सोडून. पण कधी कधी विश्वासाच्या खांद्यावर मन टाकून दीर्घ टाहो फोडावा असे वाटणे हे संवेदनेचे प्रतीक मानतो मी! मी तसा काही हलक्या काळजाचा नाही. (लोक उगाचंच कानाला दोष देतात, दोष हलक्या काळजाचा आहे बरं का!) मधुमेह,उच्च रक्तदाब असे साथी सोबतीला आहेत. त्यामुळे गरज पडली तर त्यांनाच उठवीन,तुम्हांला निरोप द्यायला,येतील ते दारापर्यत. आजकाल असं झालंय. हे दोघे जेथे जेथे जातात तेथे अगोदरच कुणी त्यांच्या नातेवाईकांनी ठाण मांडलेले असते. जाणार कुठे बिचारे म्हणून म्हटलं रहा सुखाने माझ्याकडे.
समाजाच्या परिघाबाहेर जाता येत नाही म्हणून स्वतःचंच एक वर्तुळ निर्माण करता येईल का? याचा अदमास घेत आयुष्याची कित्येक वर्षे गेली. वर्तुळ येईल पण त्याच्या त्रिज्येचे काय करायचे हा खरं तर प्रश्नच आहे. नाहीतर या संज्ञा माझ्याच उरावर बसायला यायच्या. हल्ली मी खूपच घाबरतो. त्यामुळे माणसांत माझी उठबस कमी असते. कुत्री, मांजरे आदी प्राणी आपली प्राक्तन घेऊन माझ्या जवळ बसली तर त्यांचा कळवळा येईल मला. खाल्ल्या अन्नाला जागणारी प्राणिजात आहे ही! आणि समजा चुकून अंगावर आलीच तर मूळ रूपात येऊन तरी ओरबाडतील. पण आपल्या माणसाचं तसं नाही. बेसावध असताना हल्ला करण्यात त्यांचा हात धरणारा कुणी नाही. लचके तोडल्याचे दु;ख नाही. पण माझ्या दु:खानं येणाऱ्या जाणाऱ्या पांथस्थांना सावली देणारे वडाचे झाड उन्मळून पडेल, असं सतत वाटत रहाते. वडाचे झाड उन्मळले तर त्याच्या आधाराने रहाणारे पक्षी पुन्हा त्या वडालाच शाप देणार नाहीत कशावरून? दूरच्या परगण्यातील आपली घरे टाकून कुठेतरी आश्रित होणे या पक्ष्यांना कसे जमते ते त्यांनाच माहित! काही क्षण विसावले की नात्यांची गुंतावळ वाढत जाते हे लक्षात ठेवणे, वडाला जड जाते की पाखरांना हे मला अद्याप कळलेले नाही.
शापाचा हा उलट प्रवास मला अजिबात आवडत नाही. अख्खे कौरव-पांडव कुटुंब, त्यांचे हितचिंतक आणि शत्रूही या शापात अडकले. या शापातूनच महाभारत घडले. पक्ष्यांच्या शापात ताकद आहे. अन्यथा व्याधाचा बाण लागून मेलेल्या मिलनोत्सुक क्रौंच पक्षाचा शाप वाल्मिकीच्या तोंडून निघालाच नसता. मला आजकाल भीती वाटू लागली. माझ्या अवतीभवती घोटाळणारी ही पाखरे आपले अस्तित्व टिकविण्यासाठी मला शाप तर देणार नाहीत. पाखरांचे काय सांगावे? आज येथे तर उद्या तिथे मग तर माझे काय? जाता जाता आपल्या अणुकुचीदार चोचीने माझ्यावर हल्ला तर करणार नाहीत. कारण त्यांच्या चोची तर मीच धारदार करून ठेवल्या आहेत त्या समुद्र उलथविण्यासाठी! आता ही कैफियत कोणी, कोणाची मांडायची हाही प्रश्नच आहे म्हणा!
कानोसा घेत फुलात, अलगद घुसला भुंगा
शापात गुरफटले, भीष्माचार्य न माता गंगा
वर उल्लेख केला त्याच महाभारतातला आणखी एक योद्धा म्हणजे अश्वस्थामा...चिरंजीवी तरीही दुर्भागी... कपाळावरील मण्यामुळे कायम अपराजित....कुरुक्षेत्रावरील युद्धाच्या अंतिम पर्वात, अखेरच्या क्षणी त्याच्या सुदैवाने त्याची साथ सोडली आणि पांडवाच्या वधाचे मृगजळ त्याला खुणावू लागले. युध्दाचे सारे नियम बाजूला सारून मध्यरात्री त्याने पांडव समजून पांडव समजून पांडवपुत्रांना ठार केले. विधिलिखिताच्या या लखलखीत सत्याला सामोरे जातानाच अमरत्व बहाल केलेला त्याचा त्याचा कपाळावरील मणी ज्याने षडरिपूवर विजय मिळविला त्या श्रीकृष्णाने द्वेषाने काढून घेतला आणि ती असह्य अशी भळभळती जखम घेवून,त्यावर तेल लावण्यासाठी प्रथम गेला तो द्रौपदीकडे...ज्या द्रौपदीची पाच मुले मारली गेली, ती द्रौपदीही उरात अनेक भळभळत्या जखमा वागवूनच होती, तरीही त्याने तिच्याकडे जाणे यापरत्वे दैवदुर्विलास तो कोणता? नियतीच्या या तऱ्हेवाईक ललाट लेखाचे सामर्थ्याचे अधोरेखित करीत द्रौपदीनेही त्याच्या जखमेवर तेल लावले. महाभारतातला हा अमर योद्धा आजही हिमालयाच्या कुशीत त्या जखमेसाठी तेल मागताना दिसतो आहे,असं म्हणतात. एक चूक आयुष्य बदलून टाकते अश्वत्थामासारखे... चुका होऊ नये म्हणून मृगजळामागे लपलेले वाळूचे बंदिस्त डोंगर कदाचित नजरेआड करता येतील पण त्या मृगजळात अडकलेल्या जीवांचे काय? पारध्याच्या जाळ्यात अनवधानाने जरी सापडला तरी त्याची शिकार ही होणारच! मृगजळ हे निसर्ग नावाच्या पारध्याने लावलेले जणू जाळेच!

भाग- ५ इथे वाचा ...
क्रमशः
-भिवा
रामचंद्र परब
No comments:
Post a Comment