Monday, 7 November 2016

कोंबडी आख्यान-भाग १

बॉयलर कोंबड्यात नर-मादी असा भेदाभेद नसतोचत्यामुळे या ठिकाणी सोयीने मादी संवाद आहेत. दुकानातील  लाकडी पिंजऱ्यात वेगवेगळ्या कप्प्यात ठेवलेल्या बॉयलर कोंबड्या, त्यातील कोंबड्याचा संवाद. त्या पार्श्वभूमीवर गाणे: माझा कोंबडा कोणी मारीयेला ग...किंवा आकाशी झेप घे रे पाखरा...
पहिली   :   क्कॉक.. क्कॉक.. क्कॉक.. क्कॉक..
दुसरी    :   क्कॉक.. क्कॉक.. क्कॉक.. क्कॉक..
पहिली   :  किती खेटतेस गजरा बाजूला सर की,
दुसरी    :  मी काय गादीवर लोळतेयही बघ मला कशी खेटते,
पहिली   :  ती मेली तसलीच आहे तीजाऊ देनको तीच्या नादी लागूस. मीच
               माझे पंख  बाजुला घेते.आता  झाली ना जागा?
दुसरी    :  अग बघ बघ वरच्या मजल्यावरून कोण शिटलं माझ्या  चोचीवर
पहिली   :  वरचा मजला हा हा
दुसरी    :  हसायला काय झालं,
पहिली   :  (हसत) वरचा मजला रिकामा झाला. तुला काय वाटलंहे तुझं घर
               आहे?
दुसरी    :  नसलं म्हणून काय झालं. लाजलज्जा काय कोळून प्याली की
              कायजरा बघून शिटाव म्हणते मी,
पहिली   :  ती काय करणार बिचारी! खचाखच भरून टाकलंय आपल्याला.       
               इंचभर जागा ठेवली नाही शिटायला सुद्धा. पुसून टाक.
दुसरी    :  छी घाण वाटते! काय आहेआपली आपल्याला घाण वाटत
              नाही..पण दुसऱ्याची म्हणजे..?  पेंगते बघ  कशी?
पहिली   :  एक म्हण होती
दुसरी    :  कोणती ग कोणती?
पहिली   :  कोंबडा आरवायचालोकांना उठवायचा आणि कोंबडी झोपून
               रहायची!
दुसरी    :  सपणा. दुसरं कायअंडी देणेउबवणे एवढंच काम !
पहिली   :  आणि आता मोबाईल नावाचा कोंबडा वेगवेगळ्या आवाजात
               ओरडतो. बरं झालं बाई आपल्या बॉयलर जमातीत अंडी देणं या
               सारख्या भानगडी नाहीत
दुसरी    :   हो गते काम लेअर कोंबड्यांचं,गावठी कोंबड्याचं. गावठी कुठल्या!
पहिली   :  काय करणार बाई। आलं नशिबात तसं भोगायचे झालंतुकांनी
               म्हटलंच आहे
दुसरी    :   हा कोण तुकाआणि तुला ग कुठं भेटला तो?
पहिली   :  अग असं काय करतेसआपला जिथं जन्म झाला  तिथं देवूळ होतं,
               त्या देवळातले किर्तन मी  मला समजायला लागल्यापासून ऐकत
               होते, समोर माणसं दिसतात नात्यांच्यात जे अनेक  संत होऊन
                गेले त्यापैकी तुकाराम हे एक.
दुसरी    :   स्सं अस्संमला वाटलं तू एवढं बोलतेस म्हणजे आपल्यातला एक
                कोणीतरी असावा. बरंकाय  ग काय म्हणाला तो?
पहिली   :  बघ बघ कशी माझ्या पंखात आपली चोच खुपसतेअग जरा लांब.. 
               गुदगुल्या होतात ना! अग तो म्हणालाआलीया भोगाशी असावे
               सादर, देवावर भार घालूनिया!
दुसरी    :   पूर्वीच्या काळी आपली काय ऐट होतीलोक म्हणायचे कोंबडा
               आरवल्याशिवाय सूर्य उगवत नाही
पहिली   :  आणि आता कोंबडा झाकून ठेवला तरी उजाडायचं बाकी रहातं
               काय? असं म्हणतात.
दुसरी    :  कालाय:तस्मै नम: दुसरं काय?
पहिली   :  खरं ग बाई खरंच!
दुसरी    :  हेच बघ नाआपण़ आता मरणाच्या दारात उभे आहोत. आडव्या-
               तिडव्या, एकावर एक कसंतरी आम्हांला यात कोंबलयश्वास
               घ्यायला सुध्दा मिळत नाहीतरी काचकुच करीत सगळ्या कोंबड्या
               कशा बिनधास्त आहेत.
पहिली   :  बिनधास्त कुठेबाई गज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. म्हणतात
               नासुपातले हसतातजात्यातले रडतात.
दुसरी    :  काय गतुला मरणाची भिती वाटत नाही
पहिली   :  कसली भितीमरणाचीजे होणारं आहे ते टाता येणार का ? नाही
               ना? मग कासावीस का व्हायचं?व्हा मला गाडीत फेकलं तेव्हाच
               माझं भविष्य कलं.मी कुणाच्या उपयोगी पडते हीच त्यातल्या
               त्यात समाधानाची बाब म्हणायची. मेलेलं कोबडं काय आगीला भीत
               नाहीआपण तशा मेलेल्याच आहोत. तुला नाय भिती वाटत?
दुसरी    :   वाटत होती गपण तु माझ्या बाजूला आहेस ना तुझ्याशी
               बोलल्यामुळे भिती कुठल्या कुठे पळाली.
पहिली   :  किती निर्दयपणे कापतोय मेलाजातच निर्दयी.. घाव बघ कसा
               सटासट घालतोययंत्रासारखं!
दुसरी    :   मी ऐकलंयआता माना कापायची पण यंत्रे आली.
पहिली   :   हो गस्वत:च्या स्वार्थासाठी ही माणसं कुठल्याही थराला जातील.
               नेम नाही बाई त्यांचा!
दुसरी     :  खरंच!
क्रमशः
भिवा रामचंद्र परब 

No comments:

Post a Comment