“Congratulation हं!” मंदिरातील गाभाऱ्यात घंटा किणकिणावी तसाच एक स्वर माझ्या कानात शिरला. पण माझे कोण कश्यासाठी अभिनंदन करेल म्हणून मी तिच्याकडे लक्षच दिले नाही.
“Congratulation तुषार!” पुन्हा तोच आवाज आला आणि आपलेच कोणीतरी अभिनंदन करतेय हे लक्षांत आले. मी दचकून मान वर केली आणि तीनताड उडालोच. समोर ती उभी होती. अहंकारी, कुणाशी न बोलणारी अशी ख्याती पसरलेली. माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना. दुसरे कोणी बोलले असेल म्हणून आजूबाजूला पाहिले, तर तेथे आमच्या दोघांशिवाय कोणीही नव्हते आणि ती खट्याळपणे हसत हातातली पुस्तके छातीशी धरीत माझ्या भांबावल्या चेहऱ्याकडे पहात उभी होती. कधी न घाबरता शिक्षकांशी वाद घालणारा मी मात्र तिच्या आकस्मिक येण्याने आणि अभिनंदनाने भांबावलो खरा! काय बोलावे तेच सुचेना.
“क.... कशाबद्दल?” मी जरा चाचरत पण स्वत:ला सावरून घेत विचारले. त्याचा अर्थ असाही नव्हता की मी आजपर्यत कुणा मुलीबरोबर बोललोही नव्हतो. पण अभ्यासाच्या कामाव्यतिरिक्त कुणाशी जादा लगटही नव्हती. मला मित्र ही कमीच होते. माझ्या ग्रुप मध्ये जे होते ते नवोदित लेखक कवी होते. त्यांचे लिखाण कुठल्या तरी मासिकात, साप्ताहिकात फुटकळ स्वरुपात का होईना प्रसिद्ध होत होते आणि नावाजलेल्या कवी-लेखकांच्या सानिध्यात राहायला मी तरी कोण एवढा मोठा साहित्यिक होतो.
"तुझ्या कथेला पहिल्या क्रमांकाचे बक्षिस मिळाले" तिच्या या वाक्याने माझ्या विचारांना ब्रेक लागला. "आणि तुझी कविता पण आली छापून! हा बघ अंक" तिनं तो अंक माझ्यासमोर धरला. मला काहीच सुचेना. अचानक आठवले, दरवर्षी निघणाऱ्या कॉलेजच्या वार्षिक अंकातील स्पर्धेसाठी मी माझी कथा आणि छापण्यासाठी एक कविता दिली होती. स्पर्धेचा निकाल मला कळण्याअगोदरच तिच्या हातात तो अंक होता. कदाचित मी मध्ये दोन तीन दिवस कॉलेज मध्ये आलो नव्हतो, त्या दरम्यान स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असावा. तीने त्या अंकातली पाने उलटीपालटी केली आणि माझी छापून आलेली “कळी” कविता जशी काय स्वत:चीच आहे अशा पद्धतीने ती वाचू लागली.
दिसातासाने श्वासाश्वासाने जेव्हा कळ्या वाढू लागतात
तेव्हापासूनच काही पारधी जाळी टाकून टपून बसतात.
अबोध कळ्या तारुण्याने हसतात.
जग बघण्यासाठी, जगाला सुगंध देण्यासाठी फुलतात,
खरं तर तेव्हाच त्या मृत्यूची तयारी करीत असतात.
निष्पाप कळ्या तारुण्याच्या उंबरठ्यावर खुडल्या
जातात निर्दय हातांनी,
निर्दयपणे चुरगळल्या जातात टाचांनी.
हातांना, टाचांना त्यांच्या वेदना जाणवत नाहीत.
जाणवते ती फक्त आसक्ती,
काट्यांची तर त्यांना पर्वा नसते.
सवयच पण असेल, काटेपण हाताळायची.
त्या मुक्फ्या कळ्यांना ओरडतापण येत नाही.
ऐकणारातरी कोण असतो.
वेदना साहीत जातिवंत सौंदर्य मातीत मिळते.
नतद्रष्ट जगाचे तोंड न पहाण्यासाठी.. त्या दूर जातात
....अगदी दूर दूर!
एका संथ लयीत म्हटलेली ही कविता माझीच आहे. हे विसरूनच मी ऐकली.
“तुला आवडली का?” तिचं हे वाचन संपताच मी मुर्खासारखा प्रश्न केलाच.
"न आवडली असती तर वाचली असती का?” तिनं प्रतिप्रश्न केला. “पण वाईट वाटलं”
“काय? काय वाईट वाटलं?” हिला आता आणखी कशाचं वाईट वाटलं ते कळेना.
“अजून आम्हाला तुझ्यातला कवी लेखक दिसला नाही.”
“Thank you, पण कवी लेखक दिसणाएवढा मी मोठा कुठे आहे.” एव्हाना मी माझी पुस्तके गोळा केली होती. उठणार एवढ्यात...
“अंहं, घाबरू नकोस, पार्टी नाही मागणार” मी तेथेच अडखळलो.
“पार्टीचा प्रश्न नाही. पण आता माझी गाडी आहे.” मी तिला कटविण्याचा प्रयत्न केला. पण तो तोकडा पडला.
“आणखी ही गाड्या आहेत त्यानंतर! पण समजा गाडी नाहीच मिळाली तर लांब नाही चालत जायला. पाहिजे तर मी येईन ना कंपनी द्यायला” आता मात्र माझा नाईलाज झाला. उठलो तसाच बसलो. ती माझ्यासमोर बसली. थोडावेळ कुणीच काही बोलेना. अखेरीस काहीतरी बोलायचे म्हणून मीच माझ्या कथेविषयी विषय काढला.

क्रमश:
-भिवा रामचंद्र परब
No comments:
Post a Comment