विघ्नसंतोषी माणसं सगळीकडेच असतात. कुणाचं काही भलं होताना दिसलं की, यांचा पोटशूळ सुरु होतो आणि मग त्याच्या मागे ते हात धुवून लागतात. एखादा दुःखी असेल तर त्याच्या दुःखावर आणखी कशा डागण्या देता येईल, याचाच ते विचार करीत असतात. खरं म्हणजे एक प्रकारचा विकृत आनंद ते उपभोगत असतात. आमच्या गावातील भास्कर ही एक अशीच वल्ली. सडाफटींग माणूस. भर तरुणपणात बायको वारली. मूल ना बाळ. त्यामुळे तो तसा दु:खी. या दुःखामुळेच त्याला कुणाचं सुख पहावत नाही, असा बहुतेकांचा कयास. थोडीशी शेती होती ती 'खंडाला' दिलेली. खंडाच्या येणाऱ्या उत्पनातून त्याचा उदरनिर्वाह होतो, त्यामुळे गावच्या कुचाळक्या करायला भास्कर मोकळा. त्याचे उद्योग सर्व लोकांना माहीत . पण बोला कशाला? तो आणखी दुसरंच काही उपदव्याप करून लंचाड मागे लावून द्यायचा म्हणून सर्वजण गप्प! पण त्याच्याशी बोलताना प्रत्येकजण आडून आडून त्याला त्याची जाणीव करून देतो, पण ऐकेल तो भास्कर कसला ?
'काय गो सुसल्या, काल आवाटात म्हणे पोलीस येवून गेले?' सुशिलाच्या घरात पाऊल टाकता टाकता भास्करने सहज विचारले.
'असा हो काय भावोजीनू, जसा काय तुमका म्हायेतीच नाय!' सुशिला आपल्या नेहमीच्या अनुनासिक आवाजात म्हणाली.
'माका नाही म्हायेती, मिया तळवड्याक गेल्लय पाव्हण्याकडे. दोन दिवसांनी आजच इलय. काय झाला काय ?' सुशिला समजली याला आपल्या मनातलं सगळं काढून घ्यायचंच.
'अहो आपल्या अंन्त्याची आवस, तिना रानात जावन जाळून घेतला ता...' सुशिला त्या आठवणीने गहिवरले. 'काय त्या बाईचा काळीज तरी..... घरातून चादर घेतलेन, रॉकेल घेतलेन आणि कोंच्या नकळत रानात जावन स्वतःच्या आंगार रॉकेल ओतून जाळून घेतलेन. काय हिमतीची बाई ती! आयुष्यात क्यावा मुंगी चिरडलेन नाय. देवधरम करीत ऱ्हवली. पोरासाठी पै पै जमा करीत ऱ्हवली आणि शेवटी बेवारश्यासारखी कोणाच्या हाती बोटाक न लागता गेली. पुण्यवान बाई! खराच, पुण्यवान हो बिचारी! खयच्या जन्मात तिना पाप केला म्हणान या जन्मात ता भोगूचा लागला, ता एक परमिसराक म्हायेती.'
'होय गो होय, असा मराण तिच्या दुष्मन्याक पण यवचा न्हय.'
'सगळे म्हणाले ही साधी आत्महत्येची केस आसा, म्हणान आवाटातल्या सगळ्यांनी जमान तिची जी काय चार हाडा शिल्लक ऱ्हवली. ती जाळली. अगदी पोलीस पाटील, सरपंच सगळ्यांका बोलावन आणून. तेव्हा नातेवाईक, भावकी सगळे होते. कोणाची कायेक तकरार नाय व्हती. त्यामुळे पंचनामो करुकच नाय. बरोबर मा ?'
'अगो ह्या सगळं माका म्हायेती आसा.'
'अहो पण कोणीतरी वेंगुर्ल्याक पोलिसांत निनावी तकरार अर्ज केलो. आणि मयताक जितके जण होते, त्या सगळ्यांची चौकशी करुच्यासाठीच काल पोलीस आले.अंत्याच्या झिलाक चारेक हजारोचो चुनो लागलो.'
'अस्सा ! पण मिया म्हणतय, ह्या कोणी कित्याक उपसान काढूक व्हय ?' भास्कर साळसूदपणे म्हणाला तरी त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य काही वेगळंच सांगत होते.
'आता ता तुमका म्हायेती.' सुशिला स्पष्टच म्हणाली, तसा भास्कर चिडला.
'तिया माझ्यार उगाच आळ घेव नको हा, सांगान ठेयताय.'
'मिया खयं काय म्हणतय ? अहो, अख्खो जगमुलूख म्हंता ता मिया सांगतय. काल त्या याळाक आवाटात्सुन फक्त नेमके तुम्हीच नाय व्हत्यास'
'सांगलय मा, मिया कामाक तळावड्याक गेल्लय म्हणान. ता जावं दे, माका याक सांग' भास्करने विषय बदलला.
'तुझ्या सासयेक बरा नाय असा कळला’
'व्हय, सगळीकडे रोगाची साथ पसरली' सुशिला तुटकपणे बोलली.
'म्हातारेक डाक्टरकडे तरी हेल्लय?'
'ख्यका व्हयो डाक्टर आणि फाक्टर ? लाकडा गेली मसनात, आता आमका सतौक जिवंत आसत झाली. म्हातारेन आता ऐंशी गाठली आसताली. सुनांची त्वांडा बघलेन. नात्रांची त्वांडा बघून झाली. आता पणतू पण येतीत, पण मराचा नाव काढना नाय.'
‘जाव दे गो ! म्हातारेक जगतत तितके दिवस जगाने. काय असा, ही म्हातारी माणसां क्यावा 'गुट' करतीत, तर पुन्हा दिसाची नाय. तसे त्यांचे दिवस भरत आले. आता जागतीत तितके दिवस बोनस...... खय आसा खय ती ?' तीनं घराच्या मागच्या बाजूला खूण केली.
'पाटल्याधाराक?' भास्करने आश्चर्याने विचारले.
'व्हय हो, पाटल्याधाराकच. तिका दोन दोन मिंटानी धुतलो कोण ? आणि कापडा तरी कितकी गुंडाळतलय ? तेव्हा तडेनच ठेयलय. घाण केलेन काय बादलीभर पाणी ओततय. सगळा धुवान जाता' तो त्यांना बघायला उठणार इतक्यात.
' हा हा तडेन जाव नको. तिका उघडी ठेयलय' जायला उठलेला भास्कर खाली बसला. एवढ्यात तीचा नवरा बाळगो रानातून गुरे घेवून आला आणि त्याच्या गप्पाला बसला.
'अगो, तिया ह्या सांगतय, त्या सरस्पतीन आपल्या सासऱ्याक बुधग्याक तर उघड्यावर खळ्यातच ठेयल्यान. मिया गेलाय तर सरस्पती आणि त्येचे दोन्ही जाये त्याका साफ करी व्हती. त्याचा अंगार पाणी ओतल्यानी आणि हाताक घाण लागात म्हणान वाडवणीन त्याच्या अंगावरची घाण काढीत व्हती. बघून तर माका तर कासाचाच झाला गो. जितो प्राणी मगो तो. बरे नाय त्या जीवाचे असे हाल झालेले. माका वाटता सगळीकडे रोगाची साथच आसा. घाणेरडा गो बाये ह्या शिकपान. अगो तिका आन्न तरी येळावर घालतय घास भर.... काय घाण करता म्हणान उपाशी ठेयतय ?'
'भावोजीनो, मिया काय तुमका 'तेतला' वाटतय ? सकाळ संध्याकाळ तांदळाची कणी करून त्येची पेज दितय, पण तिका खावक नको त्याका मिया काय करू ? वायच वायच आसान नसान ताप येतां, त्येनी तिचा त्वांडा कडू झाला आसताला.'
'पेजेबरोबर वायच खारातलो आंबा दी आंबटसो, त्वांडाक चव इटली. पुन व्हायचच दि हा. नायतर त्या आमटान ताप आणखी येयत.' यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पात तिघेही रंगून गेली पण अचानक भास्करने पुन्हा पोलिसांचा विषय उरकून काढला. बाळग्याने संशयाची सुई भास्करकडे वळवताच भास्कर हसला.
'अरे तुझ्या आवशीक हगवन लागली म्हणान तुझ्या बायलेन पाटल्याधाराक ठेयलेन. परस्वाधीन ती बिचारी, तुम्ही आन्न देताल्यास, त्याव्हाच ती बिचारी खातली. तिना घाण केली काय तुझी बायल बादलीभर पाणी ओतता. व्हय मगो ? '
'हं हं ' भास्करच्या बोलण्याचा रोख तिच्या ध्यानात आला नाही.
'आता तिका ताप येता, कारण ओलीत ठेयला काय ताप ह्यो येतलोच. आता म्हातारीच ती ! आज उद्या मेली तर, ज्यांका म्हायेती नाय ती म्हणतली, साथीच्या रोगानं मेली. पण ओलेल्यामुळे ताप येय ह्या जसा माका म्हायेती आसा तसाच आणखी कितक्या लोकांका तुम्ही सांगल्यास देवाक म्हायेती. सगळी लोकां माझ्यासारखी नाय...त्यांच्याचपैकी कुणी उद्या पोलिसांकडे तकरार केली तर तुम्ही म्हणताल्यास, ही सगळी भास्करचीच कामा..' हे ऐकताच सुशिला घाईघाईने उठून घरात गेली.
'ओ हडे यया....' घरातून तीन नवऱ्याला हाक मारली आणि भास्कर मनातल्या मनात हसला.
'काय हो, काय बोलता तो ?' घाबरीघुबरी होत तिनं विचारला.
'अगो विघ्नसंतोषी माणूस तो, तिया कित्याक घाबरतय ? त्याका कोणाचा बरा नको. त्याच्या ह्येका ह्येचा त्याका, हेतूतच त्याचो दिवस गेलो. पण तिया जरा आयेची काळजी घे. तिका पाटल्याधारसून हाडून वळयेत ठे. खालते व्हया तर प्लॅस्टिक घाल. पण त्यांका कुडकुडत त्या ओलीत ठेव नको. न जाणो, काय झाला तर त्याचा खापार माझ्या माथ्यार नको. काय आसा,विहिरीर झाकण घालूक येयत. पण समुद्रार खय घालतलय ? तू उगाच त्येची कळ काढलय. जावं दे, दुपारच्या टायमाक इलो. त्यांका वायच पेज वाढ'
सुशिलाने भास्करला 'बरी मेणलेली' फणसाची भाजी आणि पेज वाढली. भरपेट पेज जेवून, तृप्तीचा ढेकर देत भास्करने आपल्या घरची वाट धरली.

-भिवा रामचंद्र परब
No comments:
Post a Comment