Friday, 11 November 2016

कोंबडी आख्यान-भाग ३

     भाग- २ इथे वाचा ...
पहिली   :   पुर्वी एक बरं होत
दुसरी    :   काय बरं होतंकोण चिकन मटण खात नव्हतं की काय?
पहिली   :   देवाला कोंबडा वाहूनदेवाच्या नांवावर बळी देऊन सगळेच खात होतेच की, त्या दिवशी तो भाऊ हॉटेलात तंदुरी चिकन हाणत होता,आणि प्राणी पक्ष्यांची हत्या करणेत्यांचा बळी घेणे  कसे पाप आहे ते दोस्ताना पटवून देत होता.
दुसरी    :   लोकां सांगे ब्रह्मज्ञानआपण कोरडे पाषाणदुसरं काय?
पहिली   :   पूर्वी माणसं कमी होतीत्यामुळे खाटिकांची एकच जमात होतीआता बहुतेक सगळ्याच जाती-धर्मात खाटीक आणि कसाई निपजलेत!
दुसरी    :   तर कायआणि त्यांच्या सुऱ्याखाली बकऱ्यासारख्या निर्बलाची मान
पहिली   :   आणि बरं काआपल्या आणि पशुंच्या मांसांच्याही वाटण्याही धर्मानुसार झाल्यात
दुसरी    :   काय तरीच सांगतेस?
पहिली   :   तुला खरं वाटतं नाही नापण हे खरं आहे
दुसरी    :   मांस तर एकच आहे. धर्म-आवडीनिवडीचा याचा प्रश्न कुठे?
पहिली   :   तोच तर प्रश्न आहे. काय आहेकुणाला डुकराचं मांस वर्ज्यकुणाला बैलाचे मांस वर्ज्यकुणाला बकऱ्याचे मांस नकोकुणाला आपलं .. म्हणजे कोंबड्याचं मांस चालत नाही.. काही लोक तर मांस खातच नाही. म्हणज  काय म्हणतात ते बरे,शाकाहारी! एकाला नको ते दुसऱ्याला आवडते,  दुसऱ्याला नको तिसऱ्याला आवडते
दुसरी    :   ही काय पध्दत झाली. या माणसांचं आपलं काहीतरीच.
पहिली   :   (खिदत) गंमत तर पुढेच आहे
दुसरी    :   गंमतआता आणखी कसली ग कसली?
पहिली   :   हवं नको च्या या हट्टापायी माणूस दंगलीजापोळी करतो आणि आपल्याच माणसाच्या कत्तली करतो. समोर दिसतो ना आपल्या देहमांसाचा चिखलअगदी तसाच!
दुसरी    :    हे तर भलतंचआपल्यात नाही असं होतं कधी?का असं का?
पहिली   :   आपल्याला त्यांच्याएवढी बुद्धी द्यायला देव विसरला
दुसरी    :    कोण म्हणतो आपल्याला बुद्धि नाही म्हणून?
पहिली   :   बुध्दी असती तर या पिंजऱ्यातून सुसाट धावत जावून स्वत:ची सुटका नाही करून घेतली असती.
दुसरी    :    तेही खरंच आहे म्हणापण माणसं अशी का वागतात?
पहिली   :   माहीत नाहीपण या सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं चाललेलं असतं ना ते र्माच्या नांवाखाली!
दुसरी    :   छि काहीतरीच काय हे?
पहिली   :   हे असंच आहे बेबीअरे अचानक दुकानातली गर्दी वाढायला लागली.. काय आहे आजकी आमचा बळी घ्याची घाई झाली सर्वाना! 
दुसरी    :   आज रविवार! आई गतो एवढासा पोरगा बघ कशी मान कचकन
कापतोय त्या कोंबडीची! आणि त्यांचं ते तडफडणे शांतपणे पहातोय 
पहिली   :   तुला कत नाही कसंत्याच्या आत उद्याचा मालक दडलेला आहे
दुसरी    :   ,
पहिली   :   गल्ला मोजतोय तो मालक-त्याला त्या मालकासारखा व्हायचंय
दुसरी    :   हे आता तुला कोणी सांगितलंकानात येऊन भूत बोललं का?
पहिली   :   भूत नाहीत्याचा चेहरात्याचं पहाणं सगळं सांगून जाते बघ
दुसरी    :   अग बाई
पहिली   :   मग सांगते कायआणि तो मालक देवभक्त आहेदुकानात
               कापल्या जाणाऱ्या हजारों बळींचे पाप आपल्या डोक्यावर नको
               म्हणून तो  बालकांच्या हातून हे कृत्य करून घेतोय
दुसरी    :   म्हणजे मी नाय समजले
पहिली   :  अग अज्ञानाने केलेले गुन्हे म्हणे देवाघरी माफ होतात
दुसरी    :   म्हणजे कर्म आपण करायचे आणि त्या पापाची जबाबदारी मात्र दुसऱ्यावर
पहिली   :   बरोबर आणि हे फक्त माणसांतच घडते बरं का?
दुसरी    :   देवाया अज्ञानाला क्षमा कर..अग लप लप पाठीमागे लप..त्याच्या हाताला एवढ्यात लागू नकोस.
               (गाणे –हम छोड चले है मेहफिल को.. कभी याद आये तो मत खाना)
                                                 -समाप्त-
-भिवा रामचंद्र परब 

No comments:

Post a Comment