धुंदिल्या
स्वप्नांची राख विसावली अग्निकुंडात
उरले शब्द, नुरले सत्य...
मृतवत सारे जीवित
आकांक्षी
भावना मनाच्या... मनात विरल्या
दशा -दिशात
दाटला काळोख,मिटल्या पाकळ्या
आयुष्य जाहले
एक वैराण वाळवंट
उरले शब्द, नुरले सत्य... मृतवत सारे जीवित
गुलाबी पहात
विरली...सरली धुंदी प्रेमाची
भारलेल्या
साऱ्या संवेदना,वेदना ही स्मृतीची
उरामधली
ज्योत तेवते अखंड अविरत
उरले शब्द, नुरले सत्य... मृतवत सारे जीवित
दु:खी मनाचे
कढ... कधी उफाळून येती
त्यागुनी
सारे धाव घ्यावी,घालावी करमिठी
पाहते मी
तुझी प्रतिमा ओघळत्या अश्रुत
उरले शब्द, नुरले सत्य... मृतवत सारे जीवित
मोरपंखी आठवण
उरली... संपली प्रेमकहाणी
अर्धा इतिहास
कोरला... राहून तुझ्या वचनी
ही
शब्दफुलांची माळ गुंफिली तुझ्यात स्मृतीत
उरले शब्द, नुरले सत्य... मृतवत सारे जीवित
-भिवा रामचंद्र परब
No comments:
Post a Comment