किती कथाव्या
किती वदाव्या कहाण्या प्रीतीच्या
किती
स्मराव्या किती उराव्या कहाण्या मिलनाच्या
कशी
सप्तरंगात प्रीत नभीची अवतरली
कळत नकळत
अवनीवरती बहरली
शब्दफुलांचे
हार गुंफीत आली पाचूच्या
किती स्मराव्या किती उराव्या कहाण्या मिलनाच्या
स्पर्शात
जादू... भूल पडली वेड्या मनाला
रोमांचित
सुखासीनता आली साऱ्या देहाला
किती लपाव्या
किती पुसाव्या खुणा या ओठाच्या
किती
स्मराव्या किती उराव्या कहाण्या मिलनाच्या
हसून रुसून
प्रीत साजरी झाली चांदण्यात
नव्या
पहाटेचे नवे स्वप्न रंगविले छायेत
किती पहाव्या
किती साहाव्या घटना जीवनाच्या
किती स्मराव्या
किती उराव्या कहाण्या मिलनाच्या
-भिवा रामचंद्र परब
No comments:
Post a Comment