एक झरोका....
उन्मत्त
क्षितिजाशी फटकून वागणारा.
त्याने
लावलाय सापळा
अस्वस्थ
दुःखाच्या किनाऱ्यापासून
दूर
होण्यासाठी.
हेही नसे
थोडके!
झरोका...
निर्जीव
बाहुल्याच्या निष्पाप
डोळ्यासारखी
भासते ही
पोकळी;
मानभावीपणाच्या
वस्त्रगाळ
लेपातून भरून न येणारी,
पण कुणी
सांगितले
बाहुलीला जीव
नसतो म्हणून?
जीव लावून तर
बघा:
आरशातील
प्रतिबिंबासारखी
भासेल ती!
करूणा तिची
माझी
आसवांची
तिमिरातील
स्वप्ने
ओळखीची
दोघी सारख्या;
एकाच
झरोक्यातून वावरणाऱ्या,
डोळ्यात
स्वप्ने घेऊन
आकाश
पेललेल्या.
झरोक्यातून
आता
सुगंध येऊ
लागलाय,
मातीत
गुलाबांची स्वप्ने
दफन केली
वाटतय,
झरोका आणि
क्षितिज आता
मित्र झाले
म्हणतात.
आपलं म्हणून
कुणीतरी हवं ना,
म्हणून!
-भिवा रामचंद्र परब
No comments:
Post a Comment